अध्यक्षांचे मनोगत
अध्यक्षांचे मनोगत
सहकाराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्याचे ध्येय समक्ष ठेवून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या आपल्या बँकेने आपणा सर्वांचे आशिर्वाद, बहुमोल योगदान आणि अथक परिश्रम यामुळे या आर्थिक वर्षात बँकेला रू.१६ कोटीच्या वर नफा प्राप्त झालेला आहे. नफा रकमेच्या वाटपाचे प्रमाण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार करावे लागते. संचित तोटा प्रथम भरून काढावा लागतो. आपल्या बँकेत संचित तोटा असल्यामुळे नफ्याची रक्कम त्यामध्ये वळती करावी लागली व त्यामुळे सन्माननीय सभासदांना हया नफा रकमेतून लाभांश देता येवू शकत नसल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे.
आर्थिक सुदृढतेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरविलेले बहुतांश निकषांबाबत बँकेने यश संपादन केलेले आहे आणि यामुळेच आपली बँक पदपसल वनटक टक नसस इंदंहमक छंदा या व्याख्येत येत आहे. यामुळे बँकेला विकासाची नवनविन दालने उघडी झालेली आहे. बँकेने आपल्या ३३ वर्षांच्या कालावधीत जनसामान्यांकडे आपले लक्ष केंद्रीत करून त्यांना अनेक प्रकारचे अर्थ सहाय्य केले. यामुळे बँकेने सामान्य ग्राहकांप्रती एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे याचाच परिणाम म्हणून बँकेचा व्यवसाय सद्यस्थितीत रु.११५०.०० कोटीच्या वर गेलेला आहे. अहवाल वर्षात बँकेने रू.१६.०० कोटीच्या वर नफा कमविला बँकेच्या इतिहासात आतापर्यंत कमविलेला हा सर्वात जास्त नफा होय. परंतु अजूनही संचित तोटा असल्यामुळे सभासदांना लाभांशाकरीता अजून कळ सोसावी लागणार आहे याची आम्हाला खंत आहे.
ठेवीवरील वाढते व्याजाने दर ही गेल्या वर्षात सर्वाधिक चिंतेची बाब होती देशातील नामांकित राष्ट्रियीकृत बँकांनी तरलतेच्या अभावी ठेवीवरील व्याजदर वाढविणे सुरू केल्यामुळे स्पर्धेला तोंड देण्याकरीता नाईलाजास्तव आपल्या बँकेला सुध्दा व्याजदर वाढवावे लागले व याचाच परिपाक म्हणून बँकेच्या ठेवीवरील देय व्याजात वाढ झाली.
बँकेने काळाची गरज ओळखून प्रतिकूल परिस्थितीतही व्यवसाय वृध्दीसाठी वेळोवेळी ठेव व कर्ज व्याजदरात व्यावहारीक बदल केले व ग्राहकाभिमुख ठेव व कर्ज योजना जाहीर केल्या. ‘एसएसबी – १११ ही ११ व्याजदराची ठेव योजना अल्पावधीसाठी राबवून ठेव वृध्दी करण्यात आली. ही योजना यशस्वी करून बँकेने केवळ एक महिन्यात एकूण रू. ३५ कोटी ५९ लक्ष च्या देवी सदई योजनेअंतर्गत प्राप्त करून यानिधीचा विनियोग कर्ज वृध्दीसाठी करून व्याजउत्पन्न व लाभप्रदता वाढविण्यासाठी केला.
वेळीच उचललेल्या पावलांमुळे मंदी सदृश्य वातावरणातही आपणा सर्वांचा विश्वास
आणि पाठबळ यामुळे आपण आर्थिक वर्षात व्यवसाय वाढीबरोबरच एन.पी.ए. वसूली
करण्यात यशस्वी ठरलो, बँकेच्या सुदृढ परिस्थितीचे द्योतक असलेले बँकेचे भांडवल
पर्याप्तता प्रमाण (सी.आर. ए. आर.) १२.४६ आहे.
गेल्या वर्षीच्या अहवालात नमुद केल्याप्रमाणे आपल्या बँकेने अत्याधुनिक संगणक प्रणालीच्या कार्यवाहीची जी सुरूवात केली होती ती आता अंतिम टप्यात आली आहे. बँकेचा विस्तार वाढविण्याचे दृष्टिने लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेला नवीन शाखांचे परवान्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. परवाना प्राप्त होताच विदर्भातील वेगवेगळया जिल्हयांमध्ये शाखा उघडण्याचा बँकेचा मानस आहे.
मागील सन २०१०-११ या आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीबद्दल विदर्भ अर्बन बँक्स को-ऑप असोसिएशन, नागपूर तर्फे बँकेला विशेष प्रयास पुरस्कार’ प्राप्त झाला
आहे, हे येथे उल्लेखनि
"Shikshak Bank represents Gandhi's idea, showing strength and success."
Shikshak Sahakari Bank